जागतिक पर्यटन दिनानिमित्त बोर्डीत पर्यटन क्षेत्रासाठी डिजिटल उपक्रम


बोर्डी :जनतेचा वाली , पालघर डिस्ट्रीक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि पर्यटन संचालनालयाच्या (DOT) प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनाचा कार्यक्रम २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता बोर्डी येथील एन. के. पाटील सभागृह, एस. आर. सावे कॅम्पिंग ग्राउंड येथे आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना ‘डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पर्यटनाची पुनर्रचना’ या विषयावर आधारित आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या रिसॉर्टची जाहिरात डिजिटल माध्यमातून करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत संबंधित रिसॉर्ट व्यावसायिकांनी आपल्या रिसॉर्टची नवीन रील, व्हिडिओ किंवा छायाचित्रे डिजिटल स्वरूपात पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही सामग्री संस्थेचे संचालक राहुल म्हात्रे (नेचर स्टे, सफाळे) यांच्याकडे सोमवारपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून आपल्या पर्यटनस्थळांची आणि रिसॉर्टची व्यापक पातळीवर प्रसिद्धी करता यावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे संस्थेचे कार्यवाह अजय राऊत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *