मनोर येथे शिवध्येय अकॅडमीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात

मनोर येथे शिवध्येय अकॅडमीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात
मनोर : जनतेचा वाली ,बिरसायत, मनोर येथील शिवध्येय अकॅडमीच्या वतीने शनिवार, ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास श्री. दिग्विजय कुमावत, श्री. संतोष जनाठे, श्री. दामोदर कासट, श्री. प्रकाश खांडेकर, श्री. शिवा साळुंके तसेच अकॅडमीचे शिक्षक श्री. प्रसाद गुरव, श्री. साई केदार आणि श्री. रोशन जाधव उपस्थित होते.
यावेळी अकॅडमीचे विद्यार्थी श्री. नितेश जाधव यांची पदवीधर शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त करत शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.
उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण, सातत्य आणि मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष म्हणजे, कार्यक्रमाची संपूर्ण रचना, नियोजन व व्यवस्था अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीच सांभाळली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना आणि संघटन कौशल्याला या कार्यक्रमातून व्यासपीठ मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *