बासरीवर साकारला श्रीकृष्णाचा अविष्कार; लहानग्या जयचा अनोखा कलाविष्कार

बासरीवर साकारला श्रीकृष्णाचा अविष्कार; लहानग्या जयचा अनोखा कलाविष्कार
वसई : जनतेचा वाली गोकुळाष्टमीच्या निमित्ताने वसईतील जय कल्पेश शहा या विद्यार्थ्याने आपल्या कलाकौशल्याची अनोखी झलक दाखवली आहे. जयने चक्क बासरीवर श्रीकृष्णाचे सुंदर चित्र साकारून कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
चित्रकार कौशिक जाधव यांचा विद्यार्थी असलेल्या जयने वॉटर कलर्सच्या माध्यमातून अवघ्या एका तासात बासरीसारख्या अरुंद आणि आव्हानात्मक पृष्ठभागावर श्रीकृष्णाचे रेखाटन केले.
गोकुळाष्टमीच्या उत्सवाला कलात्मक स्पर्श देणाऱ्या या अनोख्या कलाकृतीतून कला, कल्पकता आणि श्रीकृष्ण भक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. जयच्या या अभिनव प्रयोगाचे कला क्षेत्रातून कौतुक होत आहे.
पारंपरिक कॅनव्हासऐवजी बासरीचा पृष्ठभाग कॅनव्हास म्हणून वापरत जयने साकारलेला हा कलाविष्कार लहान वयातील मोठी कल्पकता दाखवणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *