
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डहाणूत पोलीस-गणेश मंडळांची बैठक
डहाणू : जनतेचा वालीआगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डहाणू उपविभागीय पोलीस विभागाच्या वतीने श्री गणेशोत्सव २०२६ समन्वय समिती व गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन व गणेश मंडळांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मसौली, डहाणू येथील श्री दशाश्री माळी हॉल येथे ही बैठक होणार असल्याचे निमंत्रणपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
या बैठकीस पोलीस अधीक्षक, पालघर यतिश देशमुख (IPS), ),अपर पोलीस अधीक्षक, पालघर विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव, परि. पोलीस उपअधीक्षक नागनाथ लाड, तहसीलदार सुनील कोळी, तसेच डहाणू व तलासरी पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुढधे उपस्थित राहणार आहेत.
गणेश मंडळांनी उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था, ध्वनिक्षेपकांचा वापर, सुरक्षितता आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन याबाबत आवश्यक समन्वय साधणे अपेक्षित आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही बैठक मार्गदर्शक ठरणार आहे.
डहाणूत गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजनाला सुरुवात झाली असून, गणेश मंडळे आणि प्रशासन यांच्यातील समन्वयावर यंदाच्या उत्सवाची सुरक्षितता अवलंबून राहणार आहे.