
युवा नेतृत्वाचे जव्हारसह झडपोलीत जल्लोषात स्वागत
जव्हार : जनतेचा वाली:- जिजाऊ संघटनेचे. धीरज निलेश सांबरे यांची जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याने जव्हारच्या सहकार क्षेत्रात युवा नेतृत्वाचा नवा आणि जनहिताचा अध्याय सुरू झाला आहे. बँकेच्या इतिहासातील सर्वात तरुण चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली असून, जनतेच्या अपेक्षांना न्याय देणाऱ्या या निवडीचे जव्हारसह झडपोली परिसरात उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले.
जनतेच्या हितासाठी नेहमी पुढे असलेल्या धीरज सांबरे यांच्या रूपाने तरुण नेतृत्वाला संधी मिळाल्याने परिसरातील युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवक केवळ भविष्याचे नेतृत्व नाही, तर आजच्या जनतेच्या विकासाचेही खरे आधारस्तंभ ठरू शकतात, हा विश्वास त्यांच्या निवडीमुळे अधिक दृढ झाला आहे.
चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जव्हारमध्ये नागरिक, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी धीरज सांबरे यांचा जनतेचा वाली म्हणून गौरव करत सत्कार करून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वातून बँकेच्या कामकाजात आधुनिक विचार, डिजिटल तंत्रज्ञान आणि सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या सेवांना अधिक प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यानंतर विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथेही जनतेचा वाली धीरज निलेश सांबरे यांचे भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा सत्कार करत अभिनंदन केले. तरुण वयात सहकार क्षेत्रातील महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांच्या जनहितकारी नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला.

जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे, डिजिटल बँकिंगला चालना देणे आणि सर्वसामान्य जनतेला अधिक सुलभ आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नव्या विचारांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जनतेचा वाली म्हणून ओळखले जाणारे धीरज सांबरे यांचे युवा नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
युवा चेअरमन, आणि विकासाची नवी दिशा या भावनेतून धीरज निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाकडे जव्हारच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. त्यांच्या माध्यमातून बँकेच्या वाटचालीत जनतेचा आत्मविश्वास आणि आधुनिक दृष्टिकोन अधिक ठळकपणे दिसेल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
