रक्तदानासाठी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे आवाहन  लालोंडे येथे ४ ऑक्टोबरला रक्तदान शिबिर; समाजबांधवांसह रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन

पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्था, लालोंडे येथील स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालयाच्या सभागृहात हे शिबिर होणार आहे.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात समाजबांधव, रक्तदाते, आजी-माजी पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.
रक्तदान हे केवळ सामाजिक उपक्रम न राहता गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरणारे कार्य असल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आयोजकांनी सांगितले.
शिबिराच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील , चिटणीस नाशिक पाटील, विश्वस्त पदाधिकारी यांनी समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *