पूरग्रस्त कुटुंबांना अदाणी फाऊंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अदाणी फाऊंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
डहाणू : प्रतिनिधी
डहाणू तालुक्यात १० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरांसह घरगुती साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर अदाणी फाऊंडेशन आणि अदाणी डहाणू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या (ADTPS) वतीने पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा किटचे वितरण करण्यात येत आहे.
किराणा किटमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, तूरडाळ, मसूरडाळ, साखर, सोयाबीन तेल, मीठ, हळद, तिखट, अंघोळीचा व कपडे धुण्याचा साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, बटाटे आणि कांदे आदी वस्तूंचा समावेश आहे.
लोणीपाडा येथील कुंकूपाडा, आगवनमधील मोठापाडा, उमरीपाडा, ओहरीपाडा, दुबळीपाडा व कोमपाडा, डेहणे-पळे येथील लिंगापाडा, तेलवेपाडा, दांडीपाडा व बोरीपाडा यासह डहाणूतील मूकबधिर शाळा, सावटा आणि सरावली येथे किटचे वितरण करण्यात आले.
या मदतकार्यात अदाणी डहाणू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे केंद्रप्रमुख दीपक पाटील, मानव संसाधन व प्रशासन प्रमुख नित्यानंद तिवारी आणि सीएसआर विभागप्रमुख अविनाश फाटक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संकटाच्या काळात तातडीने मदत मिळाल्याने पूरग्रस्त ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *