सात कोटी रुपयांची देखभाल-दुरुस्ती असूनही फूटपाथवर झाडाझुडपांचे जंगल उगवले आहे. देखभालीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही फूटपाथची अवस्था जैसे थे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
ठेकेदार बिनधास्तपणे काम करत असून अभियंत्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. देखभाल-दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे होत नसल्याने फूटपाथवर झाडाझुडपे वाढली आहेत.
या प्रकाराची दखल घेत पालकमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. दोषी ठेकेदार आणि जबाबदार अभियंत्यांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
