अखेर बिबट्याला पकडले! बोईसर वनविभागाच्या पथकाला मोठे यश

Share:

डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने पिंजऱ्यात पकडले आहे. बोईसर वनविभागाच्या पथकाला या मोहिमेत मोठे यश मिळाले असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दहशतीला पूर्णविराम मिळाला आहे.

चिंचणी बिंबरेपाडा येथील हर्षद राऊत यांच्या वाडीत बिबट्याने रविवारी रात्री हल्ला करत एका वासराला मारले होते. त्यानंतर वनविभागाने परिसरात सापळा रचून पिंजरा बसवला होता. या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने आज सकाळपासून बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी परिसरात मोठी गर्दी केली आहे.

डहाणू तालुका आणि लगतच्या किनारपट्टी भागात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा मानवी वस्त्यांमधील वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. चिंचणी, ब्राह्मण आळी आणि आसपासच्या परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या उघडपणे फिरताना स्थानिकांना दिसून आला होता. आसनगाव येथे शेतात काम करणाऱ्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटनाही ताजी असतानाच ही कारवाई झाली आहे.

बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. वनविभागाने बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *