अवैध दारूविक्रीविरोधात डहाणू पोलिसांची धडक कारवाईसरावली, सावटा-दुबळपाडा परिसरात छापे; दोघांवर गुन्हे दाखल


डहाणू : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात डहाणू पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सरावली तलावपाडा आणि सावटा-दुबळपाडा येथे १६ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये अवैध दारूविक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत दारूसाठ्यासह एकूण ४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नागनाथ कुमणी राम लाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन्ही ठिकाणी छापे टाकले. यावेळी दिनेश मच्छी (२५, रा. सरावली, तलावपाडा) आणि कुरबान मुबारक शेख (३६, रा. सावटा, दुबळपाडा) हे अवैधरीत्या दारूविक्री करताना आढळून आले.
दोन्ही संशयितांविरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जनतेचा वाली
अवैध दारूविक्रीमुळे गावागावातील सामाजिक वातावरणावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *