
तालासरीत ४७.३१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त;
पालघर, प्रतिनिधी : गुजरातमधून मुंबईकडे अवैधरित्या नेला जात असलेला महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा तालासरी पोलिसांनी जप्त करत ४७ लाख ३१ हजार ३७६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी या अवैध साखळीमागील मुख्य सूत्रधार कोण, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या निर्देशानुसार तालासरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून एमएच-०४/एलवाय-५८९१ क्रमांकाचा आयशर टेम्पो अडवला. तपासणीदरम्यान महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. पोलिसांनी २७ लाख ३१ हजार ३७६ रुपयांचा प्रतिबंधित माल आणि २० लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण ४७ लाख ३१ हजार ३७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संजयकुमार रजवंता केवट आणि मोहमंद इशाक अहमद मोहम्मद अन्सारी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध तालासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, तालासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे, पोलीस हवालदार संदीप चौधरी, पोलीस नाईक सचिन आखाड, पोलीस शिपाई परशुराम घाटाळ तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
मात्र या कारवाईनंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असताना या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे? हा माल कोणासाठी आणला जात होता? या अवैध साखळीतील आर्थिक लाभार्थी कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केवळ चालक व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून ही साखळी थांबणार आहे का?
काही पोलिसांच्या आशीर्वादाने अवैद्य धंद्यांना पाठबळ मिळत आहे मात्र या या पोलिसांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचे काम पोलीस व गुटखात तस्कर,

जनतेचा वालीचा सवाल आहे : जिल्ह्यात वारंवार प्रतिबंधित गुटखा जप्त होत असताना या अवैध व्यापारामागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार आणि संपूर्ण रॅकेट उघड होणार कधी? तसेच, या प्रकरणात कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याची किंवा इतर व्यक्तीची संगनमताची भूमिका असल्याचे पुरावे आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे जनतेला अपेक्षित आहेत.
जनतेच्या हितासाठी केवळ वाहतूक करणाऱ्यांवर नव्हे, तर संपूर्ण गुटखा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
