चौदा वर्षांपासून ‘विद्यादान’ उपक्रमाची अखंड परंपरा; १४ जुलै रोजी कार्यपुस्तकांचे वाटप

चौदा वर्षांपासून ‘विद्यादान’ उपक्रमाची अखंड परंपरा; १४ जुलै रोजी कार्यपुस्तकांचे वाटप
वाडा, प्रतिनिधी : ‘आई अमृत फाउंडेशन’तर्फे गेल्या चौदा ते पंधरा वर्षांपासून इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना नवनीत प्रकाशनाची पाठ्यपुस्तके, ‘२१ अपेक्षित’ पुस्तिका तसेच कार्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी सलग चौदा वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत अरविंद स्मृती अनुदानित आश्रमशाळेसह ‘आई अमृत फाउंडेशन’चे नाव उंचावले आहे.
या सामाजिक उपक्रमात उदारहस्ते आर्थिक मदत करणारे दाते, शिक्षकवर्ग आणि शाळेतील कर्मचारी यांचे योगदानही मोलाचे असल्याचे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.
कार्यपुस्तकांचे वाटप गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले होते. मात्र, १ जुलैपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच बालभारतीची काही कार्यपुस्तके उपलब्ध न झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा कार्यक्रम मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता त्याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
या ‘विद्यादान’ उपक्रमात सहभागी होण्याची किंवा आर्थिक अथवा अन्य स्वरूपात सहकार्य करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी ९६१९९७७७९७ किंवा ९८१९०९८४९४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘आई अमृत फाउंडेशन’चे संस्थापक-अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील अनाधार, अनाथ व वृद्ध सेवा उपक्रमाशी संबंधित मनोज हरेश्वर घरत यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले असून, खजिनदार रविंद्र शशी परब हेही या कार्यात सक्रिय आहेत.
कार्यक्रमाचे ठिकाण : अरविंद स्मृती अनुदानित आश्रमशाळा, कळंबई (नांदणी-गायगोठा), ता. वाडा, जि. पालघर.
दरम्यान, फाउंडेशनने कोविड काळापासून १४ निराधार वृद्ध दांपत्ये व ज्येष्ठ नागरिकांना दत्तक घेतले असून, त्यांना दर महिन्याच्या १ ते ६ तारखेच्या दरम्यान नियमित रेशनचे वाटप केले जाते. शाळेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी या वृद्ध लाभार्थ्यांनाही रेशन देण्याच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *