राम तुम्हाला सोडणार नाही, राम तुम्हाला माफ करणार नाही!

Share:

वाढवणच्या पवित्र शंखोदर भूमीवरील प्रकल्पावर कॅप्टन सत्याम ठाकूर यांचा घणाघात!

वाढवण : ज्या प्रभू श्रीरामांनी समुद्राला पूजनीय मानून त्याची पूजा केली, त्याच समुद्रकिनाऱ्यावरील वाढवण येथील शंखोदर ही पवित्र भूमी आज विनाशकारी प्रकल्पाच्या विळख्यात सापडत असल्याचा आरोप काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्याम ठाकूर यांनी केला.

वाढवण बंदरविरोधी आंदोलनस्थळी बोलताना त्यांनी शंखोदरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख केला. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी या पवित्र स्थळी पूजा केल्याची श्रद्धा स्थानिकांमध्ये आहे. अशा पवित्र भूमीवर विकासाच्या नावाखाली विनाशकारी प्रकल्प लादण्याचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

समुद्र, निसर्ग, स्थानिक मच्छीमारांचे जीवनमान आणि धार्मिक श्रद्धा यांचा विचार न करता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी सरकारला उद्देशून कॅप्टन ठाकूर यांनी ठाम शब्दांत सांगितले, “राम तुम्हाला सोडणार नाही, राम तुम्हाला माफ करणार नाही!”

त्यांच्या या वक्तव्याने वाढवण बंदरविरोधी आंदोलनातील धार्मिक श्रद्धा, पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *