पालघर : पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी थेट समुद्रात उतरून आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
ठाकूर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना जल आंदोलन तात्पुरते थांबवून सुरक्षितपणे किनाऱ्यावर परतण्याचे आवाहन केले. वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील लढा घटनात्मक आणि लोकशाही मार्गाने सुरू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
“आपण ही लढाई लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने लढू आणि नक्की जिंकू. आपली जमीन, आपली गावे आणि पुढच्या पिढीचे भविष्य यासाठी आपला संघर्ष सुरू राहील,” असे ठाकूर म्हणाले.
दरम्यान, आमदार विनोद निकोले यांनीही आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची भेट घेतली.
ठाकूर यांच्या आवाहनानंतर आंदोलक समुद्रातून बाहेर आले. मात्र, वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील आंदोलन अजूनही सुरू आहे.
या आंदोलनातून प्रस्तावित प्रकल्पाला विरोध करण्याचा स्थानिक रहिवाशांचा निर्धार दिसून आला आहे.
जल आंदोलन तात्पुरते थांबले असले, तरी वाढवण बंदराविरोधातील चळवळ सुरूच आहे.
— कॅप्टन सत्यम ठाकूर
जिल्हाध्यक्ष, पालघर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
