बोईसरमध्ये उद्यापासून राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचा थरार

Share:

‘फास्टेस्ट रनर’ आणि ‘बेस्ट ॲथलिट’ पुरस्कारांचे आकर्षण; ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान स्पर्धा

पालघर, २ नोव्हेंबर : राज्यातील युवा खेळाडूंच्या क्रीडागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धांचा थरार उद्यापासून बोईसरमध्ये रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या टॅप्स ३ व ४ परिसरातील मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील निवड झालेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून ‘फास्टेस्ट रनर’ आणि ‘बेस्ट ॲथलिट’ पुरस्कार हे स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पालघर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत धावणे आणि विविध मैदानी क्रीडा प्रकारांत खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमुळे बोईसर परिसरात क्रीडाउत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.

पुरस्कारांसाठी खेळाडूंमध्ये चुरस

स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे दिले जाणारे ‘फास्टेस्ट रनर’ आणि ‘बेस्ट ॲथलिट’ पुरस्कार. सर्वाधिक वेगाने धावणाऱ्या खेळाडूला ‘फास्टेस्ट रनर’ पुरस्कारासह आकर्षक ट्रॅक सूट देण्यात येणार आहे. विविध मैदानी क्रीडा प्रकारांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘बेस्ट ॲथलिट’ पुरस्कार आणि सायकल देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे या पुरस्कारांसाठी खेळाडूंमध्ये विशेष चुरस पाहायला मिळणार आहे.

ग्रामीण-शहरी खेळाडूंना राज्यस्तरीय संधी

शालेय स्तरावरील क्रीडा गुणवत्ता शोधून तिला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाचे व्यासपीठ मिळणार आहे. खेळाडूंमध्ये शिस्त, आत्मविश्वास, जिद्द, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित करण्यासही या स्पर्धा उपयुक्त ठरणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेचे यजमानपद पालघर जिल्ह्याला मिळाल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या हस्ते टी-शर्टचे अनावरण

जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. इंदू राणी जाखड आणि मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या हस्ते स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना, पालघर जिल्हा ॲथलेटिक्स संघटना, पालघर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आणि पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटना यांचे सहकार्य लाभणार आहे. सहभागी खेळाडूंच्या भोजन व निवासाची व्यवस्था बोईसर येथील डॉन बॉस्को शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आली आहे.

राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या युवा खेळाडूंच्या क्रीडाकौशल्याचा अनुभव घेण्याची संधी पालघरकरांना मिळणार आहे. त्यामुळे नागरिक, पालक, शिक्षक, क्रीडाप्रेमी आणि क्रीडा संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढ

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *