पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी बोईसरमध्ये मोफत आरोग्य शिबिर

रविवारी बोईसरमध्ये मोफत आरोग्य शिबिर
बोईसर : महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बोईसर येथे रविवारी, १३ सप्टेंबर रोजी रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवशक्ती सामाजिक संघटना बोईसर, श्रमिक कामगार संघटना व पालघर जिल्हा तसेच श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉन बॉस्को स्कूल, बोईसर येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर होणार आहे. यामध्ये निःशुल्क स्तन कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी, मासिक धर्म आरोग्य व स्वच्छता जनजागृती तसेच निःशुल्क सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात येणार आहे.
यासोबतच नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या व आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असून, रक्तदान करण्याचे आवाहनही आयोजकांनी केले आहे.
गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, तसेच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *