पालघर तालुक्यात कोतवाल पदांच्या भरतीसाठी आरक्षण सोडत

कोतवाल पदांच्या भरतीसाठी आरक्षण सोडत
पालघर प्रतिनिधी | जनतेचा वाली
पालघर तालुक्यातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, या पदांसाठी सजानिहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पालघर तहसील कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आरक्षण सोडत २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पालघर तहसील कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर आरक्षण सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार असल्याचे तहसीलदार कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
या प्रक्रियेसाठी इच्छुक नागरिकांनी निर्धारित दिनांक, वेळ व ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार पालघर यांनी केले आहे.
पालघर जिल्ह्यात कोतवाल संवर्गासंदर्भातील प्रशासकीय नोंदी व यादी यापूर्वीही जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *