जिल्हास्तरीय कबड्डीत लालोंडे विद्यालयाचा विजयी झेंडा

लालोंडे विद्यालयाचा कबड्डीत जिल्ह्यात डंका; विभागीय स्पर्धेसाठी पात्र
पालघर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत लालोंडे येथील स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. दमदार आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाने विभागस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.
संघातील खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सांघिक खेळ, चपळाई आणि आक्रमक डावपेचांच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाबद्दल खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
संघाला क्रीडा शिक्षक मनोज पाटील तसेच सहकारी अमोल पडवळे यांचे मार्गदर्शन लाभले. विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघाकडून पुढील फेरीतही उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *