गुणवंतांचा गौरव, उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन! युवक मंडळाचा आदर्श उपक्रम

ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्थेच्या स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

पालघर (पूर्व), जनतेचा वाली दि. १४ :
कुणबी समाजाच्या सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ (पालघर तालुका पूर्व विभाग) यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन कार्यक्रम २०२५–२६ रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी लालोंडे येथील ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्थेच्या स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत रामचंद्र सातवी होते. उद्घाटन ॲड. प्रणव अशोक सूर्यवंशी (खामलोली) यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून भालचंद्र गणपत पाटील (चहाडे), सुनिल भाऊ शेलार (कोकणेर) आणि चंद्रशेखर कोंडू नाईक (दहिसर) उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून आयटी प्रमुख कुणाल अशोक ठाकूर, प्रमुख पाहुणे ॲड. प्रणय रविंद्र घरत (नानिवली) तसेच निवृत्त पर्यवेक्षक प्रा. संजय दाजीबा घरत यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, करिअर नियोजन व स्पर्धा परीक्षांबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
समाजातील विविध शैक्षणिक स्तरांवर यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रा. संजय घरत यांनी ‘अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र’ या विषयावर दहा मुद्द्यांतून अभ्यासपद्धती, वेळापत्रक, आहार, झोप, स्वच्छता, मनन–चिंतन व दृढनिश्चयाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमासाठी दानशूर व्यक्तींकडून शैक्षणिक व पुरस्कार निधी मिळाला. उद्घाटक ॲड. प्रणव सूर्यवंशी यांनी स्व. ॲड. अमृत पांडुरंग अधिकारी यांच्या स्मरणार्थ ₹५५,५५५ शैक्षणिक निधी दिला. भालचंद्र पाटील, सुनिल शेलार व चंद्रशेखर नाईक यांनी प्रत्येकी ₹१७,००० असा एकूण ₹५१,००० ‘कुणबीरत्न पुरस्कार’ निधी दिला. कुणाल ठाकूर यांनी ₹११,०००, ॲड. प्रणय घरत यांनी ₹१०,०००, तर आद्य संस्थापक राजाराम गोविंद पाटील यांनी ₹५,००० वाढीव शैक्षणिक निधी प्रदान केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वस्त चेतन पाटील, उल्हास सातवी, मनोज ठाकूर, माजी अध्यक्ष मार्तंड पाटील, अविनाश पाटील, ज्ञाती अध्यक्ष यदुनाथ पाटील, जगदीश पाटील, उद्योजक मनोज अधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर अधिकारी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चिटणीस वैभव नारायण पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *