
जि.प. पालघरमध्ये संत तुकडोजी महाराज जयंती साजरी
पालघर प्रतिनीधी जनतेचा वाली
ग्रामविकास, स्वच्छता व समाजप्रबोधनाचा संदेश अधोरेखित
पालघर, दि. ३० : जिल्हा परिषद पालघर येथे संत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी संतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. ग्रामविकास, स्वच्छता आणि समाजप्रबोधन या क्षेत्रांत त्यांनी केलेले योगदान मोलाचे असून ‘ग्रामगीता’मधून आदर्श ग्रामव्यवस्थेचा संदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्वावलंबन आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) इजाज अहमद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.