नागझरी ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात !

पालघर : नागझरी-चरी खुर्द ग्रामपंचायतीतील प्रशासकीय कारभार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे. ग्रामपंचायतीतील महत्त्वाचे दस्तऐवज हस्तांतरित न केल्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार पुढे आली आहे.


चक्क ग्रामसेवकांमध्येच समन्वयाचा अभाव उघड झाला असून, महत्त्वाचे दस्तऐवज एक ग्रामसेवक दुसऱ्याला देण्यास नकार देत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे…
या प्रकरणी नागझरी-चरी खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे…
१६ मार्च २०२६ रोजी पाठवलेल्या या पत्रात अनेक महत्त्वाचे दस्तऐवज अद्याप हस्तांतरित झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे…
यामध्ये घर नोंदणी रजिस्टर, ग्रामनिधी कॅशबुक, वित्त आयोगाच्या फाईल्स, तसेच ऑडिट नोट्स यांचा समावेश असून, या अभावामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प होत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे…
एकीकडे प्रशासन पारदर्शकतेचा दावा करत असताना, दुसरीकडे ग्रामपातळीवरच अशा प्रकारे कागदपत्रे लपवली जात असतील, तर शासनाच्या योजनांची अंमलबजावणी कशी होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे…
महत्त्वाचे म्हणजे, ग्रामसेवकच जर जबाबदारी टाळत असतील, तर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी नेमके कोणाकडे न्याय मागायचा, हा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे…
आता या प्रकरणात गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात, आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *