
तलासरी परिसरातून व्यक्ती बेपत्ता; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
पालघर : तलासरी पोलीस स्टेशन येथे मनुष्य बेपत्ता नोंद क्रमांक 05/2026 अंतर्गत एक व्यक्ती हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती 8 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची माहिती मिळाली आहे.
बेपत्ता व्यक्तीचे नाव देवराम सुकर धिंडे असे असून त्यांचा रंग सावळा आहे. घरातून बाहेर पडताना त्यांनी लाल रंगाचा शर्ट व स्वेटर परिधान केलेला होता. संबंधित व्यक्ती हे उधवा सागरशेत (कासपाडा), ता. तलासरी, जि. पालघर येथील रहिवासी आहेत.
या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा कुठे दिसल्यास तात्काळ पोहवा/940 अनिल सोनवणे, तलासरी पोलीस स्टेशन (मो. 7507407670) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.