जव्हारमध्ये तलाठ्यांचा लाचकांड उघड; ACBच्या सापळ्यात दोन अधिकारी जेरबंद

जव्हारमध्ये तलाठ्यांचा लाचकांड उघड; ACBच्या सापळ्यात तलाठी जेरबंद

पालघर जिल्ह्यातील काही तलाठी कुबेराला ही लाजवील इतके धन सध्या तलाठ्यांकडे पहावयास मिळेल, आणि त्यामध्येच भर पडली आहे ती जव्हार मधील नव्यानेच नोकरीला लागलेले दोन तलाठ्याने मोठा पराक्रम दाखवला आहे,
जव्हार : जनतेचा वाली

तालुक्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला असून दोन तलाठ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राम महसूल अधिकारी गजानन नगोरे जोहरे (सजा – जामसर) आणि सिताराम विष्णू इंगम (सजा – हिरडपाडा) यांनी घरकुल लाभार्थ्याकडून लाचेची मागणी केली होती. संबंधित लाभार्थ्याच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झाले होते. घराच्या बांधकामासाठी ट्रॅक्टरद्वारे रेती वाहतूक सुरू असताना कारवाईची भीती दाखवत या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे.
याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांनी सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी दुपारी तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी जव्हार पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, भ्रष्टाचाराविरोधात नागरिकांनी पुढे येत निर्भयपणे तक्रारी कराव्यात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *