

“आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं!” — आमदार विलास तरे यांचा इशारा, हजारो आदिवासीं पालघर जिल्हाअधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चापालघर (प्रतिनिधी): आज पालघर जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयाबाजूला आदिवासी समाजाचा प्रचंड जनसागर जमला. “आदिवासी आरक्षणात घुसखोरी होणार नाही,” अशी गर्जना करत आंदोलनकर्त्यांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला. आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित या विशाल मोर्चाचे नेतृत्व विलास तरे यांनी केले. “आरक्षण हा आमचा संविधानाने दिला हक्क आहे. तो कुणाचाही वारसा नाही! बंजारा आणि धनगर समुदायाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची कोणतीही तर्कसंगत कारण नाही,” असे ते म्हणाले. सरकारने ताबडतोब या ‘घुसखोरीच्या’ पावलांना आळा घालावा, असा ठाम इशारा त्यांनी दिला.
सकाळपासूनच विराट जनसागर क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकात एकत्र झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि घोषणांच्या रणभेरीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. “बंजारा-धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ!”, “जय जोहार, जय आदिवासी!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
मोर्च्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांना मागण्यांचे निवेदन प्राप्त करून देण्यात आले. यात अनुसूचित जमातीत घुसखोरी अवैध असल्याचे आणि ती समाजाच्या हक्कांवर प्रहार करणारी असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच, बोगस आदिवासी प्रमाणपत्रे रद्द करावीत आणि पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मंचावर विविध आदिवासी नेते, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभियंते उपस्थित होते. ते सर्व एका आवाजात म्हणाले – “आदिवासी संस्कृतीवर वारसा टिकवला नाही, तर आरक्षण टिकणार नाही.”
सभेचा संप “जय जोहार!” आणि “जय आदिवासी!” घोषणांनी करण्यात आला. राज्यभरात या आंदोलनाची चर्चा रंगली असून, आदिवासी समाजाच्या संघर्षाची नवी उमेद आज पालघरपासून सुरू झाली असल्याचा स्पष्ट संदेश दिला गेला आहे.
खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले की, “आदिवासी समाजाच्या हक्कासाठी संसदेत आम्ही ठामपण े उभ े राहू आण ि धनगर व बंजारा यांना आरक्षण दिल्यास आम्ही राजीनाम े तयार ठेवू.” तसेच आदिवासी समाजात कोणी घुसखोरी करू नय े यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी त्यांनी केली.
आमदार राजेंद्र गावित यांनी आदिवासी बांधवांना जमिनी विकू नय े याकरिता राजकीय पुढारी आण ि दलाल पासून सतर्क राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी आदिवासी बांधवांनी आपल्या जमिनी विकू नये, असे कठोर आवाहन केले. माजी खासदार बळीराम जाधव यांनी आतापर्यंत मागण्या मान्य न झाल्यामुळ े पुढील मोर्चा आझाद मैदानावर धडकेल, असा स्पष्ट इशारा दिला.