
कुणबी समाजाच्या सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या वतीने स्व. महेंद्र रत्नाकर अधिकारी स्मरणार्थ आयोजित मानाचा कुणबी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा चहाडे आणि वसरे येथील क्रीडा संकुलात उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत नानिवलीच्या सुयोग प्रतिष्ठान संघाने दमदार खेळ करत मानाचा कुणबी वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. उपविजेता — सुहास स्पोर्ट्स, गिराळे यांचा संघाची झुंज पहावयास मिळाली,
अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोहित संतोष घरत याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

कुणबी समाजाच्या सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ — पालघर तालुका पूर्व विभागाच्या वतीने स्व. श्री. महेंद्र रत्नाकर अधिकारी स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली अंतिम क्रिकेट स्पर्धा २०२५–२६ दिनांक ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी तांदूळवाडी गटातील क्रीडा संकुल, चहाडे–वसरे मैदानावर मोठ्या शिस्तीत व उत्साहात पार पडली. समाजातील युवकांना क्रीडेमार्फत संघभावना, शिस्त व आरोग्याचा संदेश देणारी ही स्पर्धा दोन दिवस रंगतदार ठरली.
स्पर्धेचे अध्यक्षस्थान सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रशांत रामचंद्र सातवी यांनी भूषविले. उद्घाटन सोहळ्यास उद्घाटक म्हणून श्री. नागेश गजानन पाटील, श्री. मधुकर पाटील, विशेष अतिथी म्हणून श्री. नितीन देव पवार, श्री. विलास शांताराम पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नरोत्तम मोरेश्वर पाटील, श्री. संकेत विलास पाटील, श्री. प्रकाश सुदाम शेलार यांची उपस्थिती लाभली. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चार संघांचा नवा प्रयोग

यंदा प्रथमच एका गटातून चार संघ सहभागी झाल्याने स्पर्धा दोन दिवसांच्या स्वरूपात खेळवण्यात आली. यामुळे खेळाडूंना अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली, तर प्रेक्षकांना दर्जेदार व चुरशीचे सामने पाहायला मिळाले. पंच, समालोचन व नियोजन अत्यंत उत्कृष्ट झाल्याने प्रत्येक सामना रंगतदार ठरला. खेळाडूंसाठी पाणी, वैद्यकीय मदत, सावली, भोजन व विश्रांतीची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. तांदूळवाडी गट, चहाडे व वसरे ग्रामस्थ तसेच आजी-माजी पदाधिकारी यांच्या सहकार्याने मैदान सुसज्ज करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल
विजेता — सुयोग प्रतिष्ठान, नानिवली
उपविजेता — सुहास स्पोर्ट्स, गिराळे
आदर्श संघ — गैलाई वरदान, नावझे
उत्तेजनार्थ संघ — विश्वास स्पोर्ट्स, तामसई
वैयक्तिक पारितोषिके
मालिकावीर — मोहित संतोष घरत (नानिवली)
उत्कृष्ट फलंदाज — मिलिंद दिवाकर पाटील (गिराळे)
उत्कृष्ट गोलंदाज — आकाश बाबुराव घरत (नानिवली)
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक — दीप सुनिल पाटील (गिराळे)
उत्कृष्ट यष्टीरक्षक — संकेत संतोष घरत (नानिवली)
उदयोन्मुख खेळाडू — संवेद सुनील पाटील (गिराळे)
मंडळाची उपस्थिती व योगदान
कार्यक्रमासाठी युवक मंडळाचे विद्यमान विश्वस्त श्री. चेतन कमलाकर पाटील, श्री. उल्हास वसंत सातवी, श्री. मनोज मोहन ठाकूर, उपाध्यक्ष श्री. अमित प्रभाकर पाटील, श्री. दिनेश माधव पाटील, चिटणीस श्री. वैभव नारायण पाटील, सहचिटणीस श्री. मुकेश नाशिक पाटील व श्री. हितेश माधव पाटील, खजिनदार श्री. अलंकार मोहन सातवी, अं.हि.त. श्री. योगेश विश्वनाथ पाटील, श्री. यतिन प्रकाश पाटील तसेच विद्यमान कार्यकारिणी सदस्य, गट चिटणीस व महिला प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी युवक मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये माजी अध्यक्ष तथा विश्वस्त श्री. मार्तंड काशिनाथ पाटील, श्री. अशोक लक्ष्मण ठाकूर, श्री. अविनाश विष्णु पाटील, श्री. कमळाकर बाळू पवार, श्री. सुनिल भाऊ शेलार, माजी अध्यक्ष श्री. गंगाराम दत्तात्रेय घरत, श्री. उमेश मोहन पाटील, श्री. पितांबर मुकुंद पावडे, श्री. हरेश्वर मोरेश्वर नाईक, डॉ. संजय जगन्नाथ पावडे, श्री. महेंद्र केशव सोगले, श्री. कल्पेश मोहन पवार, श्री. अच्युत धर्मा सातवी तसेच माजी विश्वस्त श्री. अशोक दामोदर पाटील, श्री. हिरा माणिक डोंगरे, श्री. दिलीप मधुकर सातवी, श्री. अनंत जिवन पाटील, श्री. संतोष कृष्णा पावडे, श्री. वैभव पद्माकर पाटील, श्री. भालचंद्र गणपत पाटील, माजी उपाध्यक्ष श्री. दिनेश गजानन पावडे, श्री. प्रकाश आत्माराम पाटील, श्री. प्रमोद पांडुरंग पाटील, श्री. राजेंद्र कोंडीराम अधिकारी, श्री. संदेश काशिनाथ सातवी, श्री. भावेश मोहन पावडे, श्री. अजय भास्कर पाटील, श्री. करविंद दत्तात्रेय पाटील, श्री. किशोर प्रविण अधिकारी, श्री. योगेश मोहन पाटील, श्री. जितेंद्र दत्तात्रेय पाटील, श्री. विपुल विश्वास पाटील, श्री. सुनिल काशिनाथ पाटील, श्री. महेश गणपत पाटील, श्री. नितिन दामोदर पावडे, माजी खजिनदार श्री. सचिन सदानंद पाटील, श्री. गणेश नाशिक पाटील, श्री. विकास काशिनाथ पाटील, श्री. हेमंत देऊ पावडे, श्री. भूषण साईनाथ सातवी यांचा समावेश होता.
मान्यवर व दात्यांचा सहभाग
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री. यदुनाथ पुरुषोत्तम पाटील, कार्याध्यक्ष श्री. जगदीश माणिक पाटील, तसेच सन्मा. श्री. शंकर लक्ष्मण पाटील (चहाडे), श्री. माधव शिवराम पाटील (लालठाणे), श्री. रुपेश रत्नाकर अधिकारी (नागझरी), श्री. अशोक पांडुरंग अधिकारी (नागझरी), श्री. कमलाकर रामचंद्र अधिकारी (नागझरी), श्री. किरण पद्माकर पाटील (बऱ्हाणपूर), श्री. योगेश नारायण पाटील (गुंदले), श्री. अजित अविनाश पाटील (लालठाणे), डॉ. राजमहेंद्र कमलाकर पाटील (गिरनोली), श्री. संदीप विलास अधिकारी, श्री. निभाष भास्कर पाटील, श्री. महेंद्र पांडुरंग ठाकूर, श्री. राजेंद्र सुरेश सोगले, श्री. राजेंद्र मधुकर सातवी (कुडे – अबुधाबी), श्री. कमलाकर गणपत पाटील, श्री. राजु तुकाराम घरत, श्री. विजय माणिक घरत (संपादक – जनतेचा वाली), श्री. हर्षद रमाकांत पाटील (जिल्हा प्रतिनिधी, ZEE मीडिया), श्री. संतोष रामचंद्र पाटील (जिल्हा प्रतिनिधी, ABP माझा), श्री. सुमित दशरथ पाटील (पत्रकार) यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते

Thanks & Best Regards
JANTECHA WALI
Chief Editor – Vijay M. Gharat
Mob. : +91 9764820588