पालघर नगर परिषदेच्या मतदार यादीत घोल राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आक्रमक

पालघर मतदार यादीत ‘घोळ’ उघड झाला आहे
पालघर, (विशेष प्रतिनिधी जनतेचा वाली):
पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असली तरी, यादीतील त्रुटींवर बोट ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिल माधवराव गावड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, निष्पक्ष निवडणुकांसाठी याद्यांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
मतदार यादीत मोठा घोळ झाल्या असल्याचा दावा त्यांनी पुराव्या सह केला आहे
पालघर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठीची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र, या यादीच्या संदर्भात गंभीर आक्षेप घेण्यात आले असून, निवडणुकीपूर्वीच मोठा गोंधळ उघड झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा सरचिटणीस अनिल माधवराव गावड यांनी आपल्या शिष्टमांडळा सह उपविभागीय अधिकारी आणि पालघर नगर परिषदेच्या निवडणूक विभागाकडे लेखी पत्र सादर केले आहे.
या शिष्टमंडळात अनिल गावड यांच्यासह तालुका अध्यक्ष सचिन पाटील, शहर अध्यक्ष हंसराज घरत, तसेच प्रितम राऊत, फरीद लुलानिया, श्याम पाटील, अजय गावंड, संजय राजपूत, लिंबोला व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शिष्टमंडळाच्या प्रमुख आक्षेपानुसार:
आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन: मतदार यादी तयार करताना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेश क्र. २, ३ व ४ चे सर्रास उल्लंघन झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
प्रभागातील मतदारांची संख्या अचानक घटली आहे व काही प्रभागा मध्ये वाढविण्यात आलेली आहे.
इतर प्रभागात समावेश: वगळण्यात आलेल्या मतदारांचा समावेश इतर प्रभागातील मतदारांच्या यादीत करण्यात आला आहे, टेम्भोडे – अल्याळी प्रभाग क्र. 8 मध्ये 800 मतदार बाहेरचे असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे
गावंड यांच्या शिष्टमंडळाने मागणी केली आहे की, पालघर नगर परिषदेची निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक व्हावी, यासाठी नियमांनुसार मतदार यादी तयार करणे अत्यावश्यक आहे. या गंभीर त्रुटींमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. त्यामुळे याद्यांमध्ये तात्काळ सुधारणा करून, सुधारित व अचूक मतदार यादी प्रसिद्ध करावी.
या आक्षेपामुळे पालघर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीपूर्वीच मतदार यादीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. निवडणूक प्रशासन यावर काय कार्यवाही करते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.