संघर्षातून घडलेले नेतृत्व डावलले; पालघरच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह!

शिवसेनेचे उपनेते आणि आधार प्रतिष्ठानचे सचिव जगदीश धोडी यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी भागात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, सर्वसामान्य जनतेसाठी सदैव खुले दार ठेवणारे नेतृत्व म्हणून जगदीश धोडी ओळखले जातात. राजकीय प्रवासात अनेक अडथळे, संघर्ष आणि उपेक्षा सहन करूनही त्यांनी कधीही जनतेपासून दूर जाणे स्वीकारले नाही.

राजकीय अनास्था, पक्षांतर्गत दुर्लक्ष आणि संधींचा अभाव असूनही, जगदीश धोडी यांनी आपले सामाजिक कार्य थांबवले नाही. ग्रामीण-शहरी भागातील प्रश्न, आदिवासी समाजाचे प्रश्न, सर्वसामान्यांचे दुःख-दर्द समजून घेणारे नेतृत्व म्हणून ते आजही ठाम उभे आहेत. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा पाया मजबूत ठेवत त्यांनी जनतेचा विश्वास जपला आहे.

दरवर्षी शेकडो आदिवासी वधू-वरांचे सामूहिक विवाह घडवून आणत सामाजिक बांधिलकीचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. तर दुसरीकडे ‘स्वच्छ बोईसर – निरोगी बोईसर’ या संकल्पनेतून स्वच्छता आणि आरोग्यासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन करून समाजात जनजागृती घडवून आणली आहे.

राजकीयदृष्ट्या सक्षम, अभ्यासू आणि संघटन कौशल्य असलेले नेतृत्व असूनही, पालघर जिल्ह्यात अशा नेत्याला पुढे येण्याची संधी न मिळणे हे दुर्दैवच म्हणावे लागेल. सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वर्षानुवर्षांचा संघर्ष लागतो, तो सहज निर्माण होत नाही. आजही पालघर जिल्ह्यात असे सक्षम नेतृत्व दुर्लक्षित राहणे, ही केवळ एका व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण जनतेची हानी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

तरीही, “आज नाही तर उद्या संधी मिळेल” या आशेवर जगदीश धोडी आपल्या कर्तव्यापासून ढळलेले नाहीत. जनतेसाठी झटणारे, संघर्षातून घडलेले नेतृत्व भविष्यात पुन्हा एकदा निर्णायक भूमिकेत दिसेल, अशी अपेक्षा  आम्ही व्यक्त करत आहोत  

 राजकीय अनास्थेचा बळी!

पालघर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा राजकारणाची कुरघोडी, गटबाजी आणि स्वार्थी गणिते उघडी पडली आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस झटणारे, तळागाळात काम करणारे, आदिवासी समाजाचा खंबीर आवाज असलेले शिवसेनेचे उपनेते आणि आधार प्रतिष्ठानचे सचिव जगदीश धोडी — आज राजकीय अनास्थेचे बळी ठरले आहेत.

वर्षानुवर्षे ग्रामीण-शहरी भागात जनतेच्या सुख-दुःखात उभे राहणारे, कार्यालयाचे दरवाजे कायम खुले ठेवणारे, संघर्षातून घडलेले नेतृत्व आजही संधीच्या प्रतीक्षेत आहे. राजकीय पक्षात असूनही योग्य वेळी योग्य संधी न मिळणे, हे केवळ त्या नेत्याचे नाही, तर संपूर्ण पालघर जिल्ह्याचे दुर्दैव आहे.

जगदीश धोडी यांनी कधीही जात, धर्म, पक्षीय भिंत उभी केली नाही. आदिवासी वधू-वरांचे सामूहिक विवाह असोत, स्वच्छता अभियान असो वा आरोग्य जनजागृतीसाठी मॅरेथॉन — समाजहितासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला. मात्र असे असूनही, सक्षम नेतृत्वाला डावलून राजकीय स्वार्थ जपला जातोय, हे वास्तव नाकारता येत नाही.

प्रश्न हा नाही की जगदीश धोडी सक्षम आहेत की नाहीत…

प्रश्न हा आहे की सक्षम नेतृत्वाला पुढे आणण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का?

संघटन कौशल्य, अभ्यास, अनुभव आणि जनतेचा विश्वास असतानाही जर नेतृत्व बाजूला सारले जात असेल, तर ही राजकीय अनास्थाच नव्हे का? पालघर जिल्ह्यातील जनतेला सक्षम नेतृत्व मिळू नये, हीच काहींची भूमिका आहे का, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.

आज नाही तर उद्या संधी मिळेल, या आशेवर जगदीश धोडी अजूनही जनतेसोबत ठाम उभे आहेत. पण संघर्षातून घडलेले नेतृत्व जर वेळेआधीच संपवले गेले, तर त्याची किंमत संपूर्ण जिल्ह्याला मोजावी लागेल.

ही केवळ एका नेत्याची गोष्ट नाही… सर्वच राजकीय पक्षाने आपापल्या पक्षातील एकही सक्षम नेतृत्व घडवले नाही

हा पालघरच्या भविष्यासोबत केलेला अन्याय आहे!

Thanks & Best Regards

JANTECHA WALI

Chief Editor – Vijay M. Gharat

Mob. : +91 9764820588

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *