
बोईसर | प्रतिनिधी जनतेचा वाली
बोईसर (पूर्व) येथील बेटेगाव परिसरात डॉ. जान्हवी पाटील यांच्या ‘स्वारोग्य – शुद्ध होमिओपॅथी, समग्र आरोग्य, केस व सौंदर्य उपचार केंद्रा’चे भव्य उद्घाटन सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
या उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री . गणेशजी नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, माजी आमदार श्री. हितेंद्र ठाकूर, आमदार श्री. राजेंद्र गावित, आमदार श्री. विलास तारे, बोईसर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वर्तक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
‘स्वारोग्य’ केंद्रात शुद्ध होमिओपॅथी उपचारांसह समग्र आरोग्य, केस गळती, त्वचारोग तसेच सौंदर्यविषयक आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार देण्याचा या केंद्राचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हा उद्घाटन सोहळा रूपराजत पार्क, टाटा हौसिंग समोर, चिल्लर रोड, बेटेगाव, बोईसर (पूर्व) येथे पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. संजय जनार्दन पाटील व परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

