प्रस्थापित नगरसेवकांना पुन्हा संधी देऊ नका! नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ मतदारांनो सोडू नका.

पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नागरपरिषदेची अवस्था बिकट

पालघर – (प्रतिनिधी):
पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मतदारांमध्ये आता बदलाची लाट उमटू लागली आहे. गेल्या काही वर्षांत नगरपरिषदेच्या विकास कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव, ठेकेदार आणि काही नगरसेवकांमधील संगनमत, तसेच भ्रष्टाचाराचे जाळे यामुळे जनतेत तीव्र असंतोष आहे.
25 वर्षापासून तेच नगरसेवक ते चेहरे तीच आश्वासन तीच कामाची पद्धत विकास करायचा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका ! नवीन चेहऱ्यांना संधी देऊन नगरपरिषदेचा इतिहास बदला.

रस्ते, गटार, पाणीपुरवठा, सुशोभीकरण, हुतात्मा सुशोभीकरण बाळासाहेब ठाकरे उद्यान, साफसफाई कचरा व्यवस्थापन, कचऱ्यांचे ढीग दुर्गंधी, मशानभूमी , गल्ली बोलीतील काँक्रीटचे रस्ते फेवर ब्लॉक णि इमारत बांधकाम यांसारख्या कामांमध्ये फुगीर अंदाजपत्रकं तयार करून मोठ्या प्रमाणावर निधीची उधळपट्टी झाल्याच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत. काही नगरसेवक, ठेकेदार आणि प्रशासकीय अभियंत्यांच्या त्रिकोणी युतीमुळे नगरपरिषद विकासाऐवजी लूटमारचे केंद्र बनल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

उच्चशिक्षित नगराध्यक्ष निवडा ; राजकीय पक्ष अपक्ष कोणताही उमेदवार देताना विचार करा

पालघर नगर परिषदेतील नागरिकांचा सर्वांगीण विकासासाठी चांगल्या नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आता पालघरच्या मतदारांवर आले आहे! राजकीय पक्षांच्या कुबड्या निष्ठा ठेवून डोळे झाक मतदान करू नका 25 वर्षाचा हिशोब या निवडणुकीत घेण्याची संधी

शहराच्या विकासाऐवजी स्वतःच्या तिजोरीत भर टाकणाऱ्या अशा नगरसेवकांना आता “रामराम” करण्याची वेळ आली आहे, असा सूर मतदारांच्या चर्चेतून उमटतो आहे

नवदेवी दर्शन, नवरात्र गणपती सण उत्सव ,साई बाबा पदयात्रा यांना भरीव मदत, क्रिकेट खेळासाठी पैशाची रेलचेल, असे एक ना अनेक मतदारांना वर्षभर टिकून ठेवण्यासाठी काही नगरसेवक या पद्धतीचा अवलंब करतात आणि पाच वर्षानंतर मत मागण्यासाठी पुढे येतात ते चेहरे आता तुम्हाला बदलायचे आहे ,कारण या चेहऱ्याच्या मागे लपला आहे तो भ्रष्टाचार! विकास कामातूनच टक्केवारीच्या जोरावरच हा खेळ सुरू असतो.
“पालघरच्या नगरपरिषदेचा चेहरा आणि कारभार बदलायचा असेल, तर नव्या, शिक्षित आणि पारदर्शक नेतृत्वाला संधी द्यायलाच हवी,” अशी भूमिका अनेक नागरिकांनी घेतली आहे.

यावेळी मतदारांनी पैशाच्या आमिषाला बळी न पडता स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुकीसाठी प्रशासन व निवडणूक आयोगाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या पालघर नगरपरिषदेची सुटका करणे, हेच शहराच्या प्रगतीसाठी गरजेचे असल्याचे स्पष्ट चित्र आता दिसू लागले आहे.

“पालघर बदलेल, तरच विकास वाढेल —
जुन्यांना रामराम, नव्यांना संधी द्या!”

🚩 👈 खरा विकास हवा असेल तर चेहरा बदला!
पालघर मतदारांचा नवा निर्धार — भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात फसलेल्या नगरपरिषदेला मतदारांना सोडवा👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/aE_TXgK6YDs?si=nH3lmkxcfSlcHGH-

✍️आपला जिल्हा आपली बातमीपत्र पहा रोख ठोक जनतेचा वाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *