पालघर तालुक्यातील नागझरी–किराट–रावते रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ग्रामीण भागातील रस्ते खराब केले, मात्र मुंबई वडोदरा एक्सप्रेस वर पर्यायी रस्ता म्हणून स्थानिक प्रवाशांना बंदी का ?

पालघर प्रतिनिधी :-  विजय घरत
पालघर तालुक्यातील नागझरी–किराट–रावते रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे… तब्बल सात कोटी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता अवघ्या महिनाभरात खराब झाला
होता, संघर्ष समिती नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले होते संतप्त नागरिकांनी नवीन रस्ता करण्याची मागणी केली होती… pwd चे कर्तव्यदक्ष असलेल्या कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी थेट नवीन रस्ता बनवण्यासाठी ठेकेदारांना सांगितल्यानंतर या कामाला सुरुवात झाली, मुंबई आयआयटी कडून अत्याधुनिक मशनरी घेऊन नवीन तंत्रज्ञान व चांगल्या दर्जाचा रस्ता बनवण्यास सुरुवात झाली ,मात्र या दरम्यान पर्यायी रस्ता खुला करण्यासाठी खासदारांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र दिल्याची मागणी संघर्ष समितीने केली खासदार हेमंत सावरा यांनीही पत्रही दिले, फोन ही केला ,… पण त्या पत्राकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे…
दरम्यान, या प्रश्नावर बोईसर मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्यावरही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जातेय… कार्यकर्त्यांनी वारंवार निवेदन देऊनही फोन करून ही रस्ता खुला करण्याबाबत ठोस हालचाल दिसत नसल्याचा आरोप आमदार विलास तरे यांच्यावर होत आहे, लोकप्रतिनिधी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करत नसतील तर असे आमदार खासदार काय कामाचे असा थेट सवाल इथल्या नागरिकांनी केला आहे
… मुंबई–वडोदरा एक्सप्रेसवेच्या कामामुळे आधीचे रस्ते बाधित झाले असून, पर्यायी मार्ग बंद केल्यामुळे विद्यार्थी, कामगार आणि प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपन्यांकडून या रस्त्यावर नागरिकांसाठी काही दिवसांसाठी सूट ठेवली होती, मात्र ही वाहतूक बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत… लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसत असल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे… त्यामुळे पालघर जिल्ह्यात लोकप्रतिनिधींचे ऐकले जाते की प्रशासन आपली मनमानी करत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे आमदार खासदार लोकप्रतिनिधी काय कामाचे असा थेट सवाल आता उपस्थित केला जातोय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *